जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन वेळोवेळी नियम लागू करीत असतात. प्रत्येक जळगावकराने संविधान आचरणात आणून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रेल्वेस्थानकाबाहेरील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले की, आपण सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचरणात आणून नियमांचे पालन करावे तसेच सद्याच्या परिस्तिथीत कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाने दिलेले नियमांचं पालन करावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, नगरसेवक चेतन सनकत, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, अनिल अडकमोल, अजय घेगट व मनपा अधिकारी आणि समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.
कोरोनाचे नियम पाळून अभिवादन करण्याचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियम पाळून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी शांततेत आणि गर्दी न करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास यावे असे आवाहन देखील महापौर आणि उपमहापौर यांनी केले आहे.