डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’

मार्च 25, 2021 6:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे, समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे, जवानांप्रती सदैव कृतज्ञ राहणारे पूज्य डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांचा सातवा स्मृतिदिन आज (25 मार्च 2021) डॉ. हुजूरबाजार हॉस्पिटलमध्ये अतिशय भावनिक वातावरणात साजरा झाला. यावेळी डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

dr

याप्रसंगी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार यांच्यासह महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, ललित धांडे आदी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की पूज्य दादांच्या कार्याची ओळख ही पिढ्यान्पिढ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी निरंतर प्रेरणादायी राहणारी आहे. दादांनी समाजाची सेवा करण्याची कृतिशील भगवद्गीताच जणू लिहून ठेवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शक पथावर निरंतर कार्य करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. आम्ही सर्व समाजसेवक या कृतीसाठी वचनबद्ध आहोत. सद्यःस्थितीतील ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने पूज्य दादांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देऊन आम्ही सर्वजण निश्चितपणे कृतार्थ होऊ.

Advertisements

‘जळगाव रत्न’ पुरस्कारासंदर्भातील पत्र यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी डॉ. हुजूरबाजार यांच्याकडे सुपूर्द केले.

Advertisements

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही गौरविणार

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिकेने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर केला जाईल, असेही याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now