---Advertisement---
वाणिज्य

ट्रम्पचा भारताला मोठा धक्का ; परस्पर शुल्क लागू करणार, तारीखही केली जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एक मोठा झटका दिला आहे. भारतासह जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांवर रेसिप्रोकल टैरिफ म्हणजे परस्पर शुल्क लागू केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी अमेरिकेतील संसदेला संबोधित करताना केली.

donald trum

डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेला संबोधित करताना म्हणाले की, भारतासह चीन, मॅक्सिको, कॅनडा हे देश अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात कर लादतो. आमच्यावर १०० टक्के कर लादतो. जे योग्य नाही. आता जो देश अमेरिकेवर टॅरिफ लादेल. त्या देशावर देखील टॅरिफ लादला जाईल.यावेळी ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅरिफ लागू होण्याची तारीख देखील जाहीर केली. २ एप्रिलपासून परस्पर कर लागू केला जाणार आहे.

---Advertisement---

ट्रम्प यांनी अमेरिकेवर कर लादणाऱ्या काही देशांची नावेही सांगितली. ते म्हणाले की, सरासरी युरोपियन युनियन, चीन, ब्राझिल, भारत, मेक्सिको आणि कॅनडा आपल्यावर कर लादतात. तुम्ही याबद्दल ऐकले आहे का? असंख्य इतर देश आपल्याकडून आकारलेल्या शुल्कापेक्षा खूप जास्त शुल्क आकारतात. हे खूप अन्याय आहे. डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘२ एप्रिलपासून अमेरिका देखील त्यावर शुल्क लादणाऱ्या देशांवर समान शुल्क लादेल. कमी नाही आणि जास्तही नाही. १ एप्रिल रोजी परस्पर शुल्क लागू करण्याची आमची योजना होती, पण ते एप्रिल फुल डेशी जोडले जाऊ नये असे मला वाटत होते.’

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment