---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

ठाणे, नवी मुंबईनंतर आता ‘या’ महापालिकेत शिवसेनेला मोठं खिंडार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर राज्यभरातून अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

udhav thakre jpg webp

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ४० नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 54 नगरसेवक आहेत. यातील काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट घेतलेल्या नगरसेवकांची संख्या जवळपास ४० असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेला खिंडार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

---Advertisement---

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत कल्याण, डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश सर्व नगरसेवक आणि नगरसेविका तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक व युवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्राचा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---