---Advertisement---
वाणिज्य राष्ट्रीय

मार्च महिना संपण्याआधी ही महत्वाचे कामे करा, अन्यथा १ एप्रिलपासून बसणार आर्थिक फटका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । नवीन आर्थिक वर्ष सुरु व्हायला आता अवघा आठवला उरला आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. त्यामुळे हे आर्थिक वर्ष संपण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत. अन्यथा तुम्हाला १ एप्रिलपासून आर्थिक फटका बसू शकतो. यामध्ये टॅक्स वाचवण्यापासून ते आयटीआर फाइल करण्यापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे.

finance

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक
पीपीएफ (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samruddhi Yojana) कमीत कमी रक्कम डिपॉझिट करणे गरजेचे आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जमा करायची आहे. म्हणजे तुम्ही पीपीएफमध्ये ५०० तर सुकन्या समृद्धी योजनेत २५० रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

---Advertisement---

टॅक्स सेविंग इन्व्हेसटमेंट
तुम्हाला जर आर्थिक वर्षातील टॅक्स वाचवायचा असेल तर ३१ मार्चपूर्वी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. तुम्हाला आयटीआर फाइल करताना टॅक्स डिडक्शनचा क्लेम करता येणाक आहे. यामुळे तुमच्या १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्स वाचणार आहे.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट स्कीम
तुम्हाला जर महिला सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. ३१ मार्चनंतर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकत नाही. या योजनेत ७.५ टक्के व्याजदर मिळते.

अपडेटेड आयटीआर फाइलिंग
तुम्ही जर मागच्या वर्षी आयटीआर भरताना काही चुक केली असेल तर ती दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्ही ३१ मार्चपासून अपडेटेड आयटीआर फाइल केला आहे. जर तुम्ही जर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले नाही तर ३१ मार्चपर्यंत अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात.

नवीन आर्थिक वर्षाचं प्लानिंग
तुम्हाला तुमच्या नवीन आर्थिक वर्षाचं प्लानिंग करायचं आहे. म्हणजे नवीन वर्षात कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची आहे किती गुंतवणूक करायची आहे यासाठी प्लानिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर भरताना अडचणी येणार नाहीत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment