⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! महाराष्ट्रातील ‘या’ विभागामार्फत 5182 पदांसाठी भरती सुरु

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! महाराष्ट्रातील ‘या’ विभागामार्फत 5182 पदांसाठी भरती सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत विविध पदांच्या 5182+ जागा भरल्या जाणार आहे. DMER Mumbai Bharti 2023

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 10 मे 2023 पासून सुरु झाली. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 मे 2023 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती?
प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका, मिश्रक, वसतीगृह अधिक्षक, वरिष्ठ लिपीक, आहार तज्ञ, संग्रह पडताळक क्ष-किरण तंत्रज्ञ, संग्रहपाल, वाहन चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. 

12वी पाससाठी 1600 पदांवर भरती सुरु

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 1,22,800 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.

अर्ज फी :
खुला वर्ग: रु. 1000/- + बँक शुल्क
मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ अनाथ: रु. 900/- + बँक शुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023
वेबसाईट : www.med-edu.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.