⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | बातम्या | डोंगरकठोरा येथे आयुष्मान भारत योजनेचे डिजिटल कार्ड वाटप

डोंगरकठोरा येथे आयुष्मान भारत योजनेचे डिजिटल कार्ड वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत योजना)अंतर्गत आयुष्मान डिजिटल कार्डचे लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमा प्रासंगी डों. कठोरा गावचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गोविंदराव पवार, सरपंच नवाज बिस्मिल्ला तडवी, उपसरपंच धनराज देविदास पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश जावळे व आशा वर्कर दिपाली जावळे आणि जयश्री जंगले  यांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनाचे डिजीटल कार्ड वाटप करण्यात आले.

आयुष्यमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील  देशातील १० कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये ५ लाखापर्यंत सर्जिकल व मेडिकल उपचाराच्या माध्यमातून मान्यता प्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालयातील सेवा देण्यात येत आहे. त्यात राज्यातील ८३.७२ लक्ष कुटुंबाचा समावेश असून यामध्ये शहरी भागातील २४.८१ लक्ष कुटुंब व ग्रामीण भागातील ५८.९१ लक्ष कुटुंबांचा समावेश आहे.

सदर कैम्पचे आयोजन स्वप्निल धनगर, कांचन फिरके, शुभम जावळे, यांची डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या अनमोल सहकार्यानी केले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.