⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १२०० छत्र्यांचे वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वेगा केमिकल्स प्रा.लि. जळगाव, जनता सहकारी बँक, धुलिया सायकल कंपनी आणि एपी कन्सल्टन्सतर्फे उन्हापासून बचावासाठी छत्र्या देण्यात आल्या. २७ रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये फिरताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शहरातील बँक व उद्योगसमूहांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांसाठी छत्र्या प्रायोजित करण्याचे कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांना आश्वासन दिले होते. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, वेगा केमिकल्सचे संचालक भालचंद्र पाटील, अनिकेत पाटील, निमिष पाटील, जळगाव जनता सह. बँकेचे संचालक नितीन झंवर, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी, धुलिया सायकल कंपनीचे समीर रोकडे, एपी कन्सल्टन्सचे अजय पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार, प्र.संचालक प्रा.मनीष जोशी आदी उपस्थित होते.
वेगा केमिकल्स प्रा. लि. यांनी ५००, जळगाव जनता सह. बँकेकडून ३००, धुलिया सायकल कंपनीकडून २०० आणि एपी कन्सल्टन्स ॲण्ड इंजिनिअर यांच्या वतीने २०० अशा जवळपास १२०० छत्र्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आल्या आहे.