---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात पाठ, कंबर, गुडघे, मणका आजाराच्या तपासणी शिबिराचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात जागतिक आरोग्य दिनानिमीत्त दि ७ एप्रिल रोजी पाठ,कंबर,गुडघे मणका आजाराची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना मोफत तपासणी व सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे.

doctro jpg webp

रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे पाठीचा कणा, मणके यांच्या दुखण्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलींमुळे, व्यायाम करण्यासाठीही नागरिकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे यात भरच पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून या शिबिरात पाठदुखी, कंबरदुखी, गुडघे दुखी, मणक्याचे जुने आजार, कंबर,मान दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, स्लिप डिस्क या शिवाय जन्मजात व्यंग, हाडांचा ठीसूळपणा, वेदना, इ बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरज भासल्यास सवलतीच्या दरात एक्स रे आणि रक्त तपासणी करण्यात येणार आहे.

---Advertisement---

शस्त्रक्रियेची गरज भासल्यास महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गुडघा बदल,खुबा बदल, लिगामेंट शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यकच असून निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. शुभम ९३७३८८३७१७ आणि डॉ.अंकीत ७८७५६६०४९५ यांचेशी या क्रमांकावर संपर्क साधावा.शिबिर फक्त १ दिवसच असून जास्तीत जास्त रूग्णांनी सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पडींत यांनी केले आहे.

या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अस्थीरोग तज्ञ डॉ. दिपक अग्रवाल आणि डॉ प्रमोद सारकेलवाड (जॉइंट रिप्लेसमेंट व स्पाईन सर्जन) हे तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहे. १० निवासी वैद्यकिय तज्ञांची देखिल नेमणूक करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर ६० बेडचा स्वतंत्र अस्थीरोग वार्डमध्ये या रूग्णांवर पुढील उपचार करण्यात येणार आहे तसेच अत्यावस्थ रूग्णांसाठी अतिदक्षता विभागात ५ बेड राखीव ठेवण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment