जळगावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

डिसेंबर 24, 2025 5:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली (भारत सरकार) यांच्या निर्देशनानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात आगी व रासायनिक आपत्तींच्या नियंत्रणासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नुकतेच विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

apatti

या कार्यशाळेत एमआयडीसीमधील सर्व सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अग्निशमन विभाग, तसेच जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, नाशिक यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या माध्यमातून टेबल टॉप मीटिंग, मॉकड्रील व रासायनिक आपत्ती विषयक सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

Advertisements

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत जळगाव एमआयडीसी येथील आर.जे. फूड्स येथे टेबल टॉप मीटिंगचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL), MIDC येथे प्रत्यक्ष मॉकड्रील राबविण्यात आली.

Advertisements

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रोहन घुगे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच इतर ठिकाणी उद्भवू शकणाऱ्या विविध आगीसारख्या आपत्ती व त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण, तयारी व विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपुरे, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक झोपे, उपअभियंता गांधिले, उपविभागीय अधिकारी एरंडोल मनिष कुमार गायकवाड, नायब तहसीलदार लक्ष्मन सातपुते, NDRF पुणेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. पुनिया, BPCLचे श्री. जगताप, नितीन आमले, तसेच मनपा अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now