बातम्या

‘सीआयडी’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्याचं निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । सीआयडी (CID) या लोकप्रिय मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहते देखील अभिनेत्याच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.

दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती दयानंद शेट्टी यांनी दिली होती. अशातच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

उपचारा दरम्यान दिनेश यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 12 वाजता दिनेश फडणीस याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्यावर मंगळवारी 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार ‘सीआयडी’ शोची संपूर्ण टीम आताच्या घडीला दिनेश याच्या निवासस्थानी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button