जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । जळगावात धुलीवंदनाच्या निमित्ताने तरुणांनी मनसोक्तपणे संगीताच्या तालावर थिरकत जल्लोषात धुलीवंदन सण साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई एकत्र जमल्याचे बघायला मिळाले आहे.

धुलिवंदनाच्या सणादिवशी जळगाव शहरातील विविध ठिकाणी रंगांची उधळण जागोजागी होताना दिसून येत होती. सकाळपासून गल्ली रस्ते कॉलनी मॉल, लॉन या ठिकाणी धुलिवंदन आयोजन करण्यात आले होते. रस्त्याच्या किनारी बाजारपेठेमध्ये रंग विकणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. मातीच्या रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत होती तर सिल्वर ब्लॅक सोनेरी या रंगानाही मागणी होती.
शहरातील खान्देश सेंट्रल मॉल, शिंदे शिवसेना पक्ष तर्फे पांडे चौकात डीजेच्या तालावर धुलिवंदन चे आयोजन करण्यात आले होते. तर त्याच पुढे शेणफडू वस्तीगृह या ठिकाणी शावर लावून धुलिवंदन सादरी करण्यात येत होती. दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बंधू – भगिनींसोबत होळी साजरी केली. जळगावच्या पाळधी या आपल्या गावी मंत्री गुलाबराव पाटील हे आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बंधू-भगिनींसोबत आदिवासी नृत्य केज्याचे पाहायला मिळालं
दरम्यान शहरात चालकांनी मद्य सेवन करुन वाहने चालवू नये म्हणून पोलिस बंदोबस्त होता. ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी यांनी दिले होते. सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेला दिसून येत होता.