---Advertisement---
नोकरी संधी

तरुणांसाठी खुशखबर.. धुळे अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 6 धुळे पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Dhule Police Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. Dhule Police Recruitment 2022

Police Bharti

एकूण जागा : ५९

---Advertisement---

पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12th वी पास असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

अशी होईल निवड?

शारीरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवाराचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीहील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारीरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि. १०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.

राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम १०० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस दलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---