दिवाळीला सुरुवात झाली असून दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीचा आहे. या दिवशी आपण धनाचे तसेच लक्ष्मीचे पूजन करतो. चला तर जाणून घेवू धनत्रयोदशीला कश्या पद्धतीने पुजा केली जाते आणि शुभ मुहुर्त काय आहे?
अश्वीन महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला दिवा ठेवला जातो. त्याने अकाली मृत्यू टळतो,असे म्हणतात. आज २९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी हा मुहूर्त सुरु झाला आहे. तो मुहूर्त दुपारी १.१५ ला समाप्त होणार आहे. चला तर जाणून घेवू पुजा करण्याचा मुहुर्त.
धनत्रयोदशीला पुजा कशी केली जाते?
धनत्रयोदशीला तुम्ही घरात दिवा लावली की, नकारात्मकता घरापासून लांब जाते आणि सकारात्मकता घरात येते. तर पुजा करताना गव्हाच्या पिठाचा गोळा करुन घ्या. पिठात हळद मिक्स करुन कणीक मळा. त्यांनतर दिव्यात लांब वाती तयार करुन ठेवा. सोबत कापूर ठेवा. आता दिव्यामध्ये चार वाती चार दिशेला ठेवा. आणि त्यात तिळाचे तेल टाका. या पद्धीने दिवा तुम्ही तयार करुन पुजा करु शकता.
पुजा करताना मुख्य दरवाजा जिथे असेल तिथे थोडी साखर किंवा गव्हाचे पीठ ठेवा त्यावर दिवा लावा. दिवा लावताना दक्षिण दिशेकडे पाहा. याचे कारण म्हणजे यमाचे स्थान दक्षिणेला असते, असे मानले जाते. यम दीपदान मंत्राचा जप केला जातो तो पुढील प्रमाणे आहे.
मृत्युना दण्डपाशाभ्यां कालेन शामया सहा |
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ||
या जपाचा वापर धनत्रयोदशीला केला जातो. कारण, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे मृत्युपासून संरक्षण करण्यासाठी ही पुजा केली जाते. त्याने आपण किंवा आपले कुटुंबीय (यमाच्या) मृत्युच्या तावडीतून आपण वाचू शकतो असे म्हणतात. हा जप २९ ऑक्टोबरला ५.३० मिनिटांनी करावा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.