⁠ 
[rank_math_breadcrumb]

समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धनगर समाजाच्या मेळाव्यात १५० युवक – युवतींनी दिला परिचय, जुळले १० विवाह

जळगाव लाईव्ह न्यूज । आपल्या समाजाचा अभिमान बाळगून समाजाशी असलेली नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य आहे. कुठल्याही क्षेत्रात मोठ्या पदावर गेल्यावर समाजाचे कार्य करत राहावे, असे आवाहन आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी केले. शहरातील अल्पबचत भवनात रविवारी २२ रोजी राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधु – वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्यात १५० हुन अधिक युवक – युवतींनी परिचय करून दिला. यावेळी १० विवाह जुळण्यात आले.

राज्यातील धनगर समाजातील सर्व शाखीय विवाह जोडणाऱ्या “मांगल्य” वधु वर सुचक केंद्र जळगाव आणि जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने २९ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भोळे यांनी समाजाविषयी राज्य शासनाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच समाज वधु – वर परिचय मेळाव्यास उपस्थित युवक – युवतींना शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे, दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वैशाली ढेरे, मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, मनपा नगरसेवक चंद्रशेखर पाटील, केशव पातोंड, डॉ.सिद्धांत घोलप, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, रमेश सुलताने, अरुण ठाकरे, रामचंद्र चऱ्हाटे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल आदी उपस्थित होते.

युवक – युवतींनी व्यक्त केल्या अपेक्षा
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वल करण्यात आहे. त्यानंतर समाजाच्या वधू – वर सूचीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित विवाह इच्छुक युवक – युवतींनी आपला परिचय करून दिला. त्यात तरुणींनी वारासाठी अनुरूप, सरकार नोकरी, व्यवसाय आणि शेतीला प्राधान्य अशी अपेक्ष व्यक्त केली. तसेच तरुणांनी मुलीविषयी अनुरूप, शिक्षित अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक मांगल्य वधु वर सुचक केंद्राच्या संचालिका रेखा न्हाळदे यांनी केले. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि गणेश बागुल यांनी केले. आभार धर्मा सोनवणे यांनी मांडले. यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, डी. बी. पांढरे, अरुण ठाकरे, महेंद्र सोनवणे, डिगंबर सोनवणे, प्रवीण पवार, प्रमोद चऱ्हाटे, कुणाल सुलताने, उमेश सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे, संदिप (पिंटू) मनोरे आदींनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.