---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र राजकारण

अखेर महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा संपला! देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल २३० जागांवर अभूतपूर्व यश मिळाले. तरी देखील नवीन सरकार स्थापन झाले नव्हते. गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले असून उद्या सायंकाळी ५ वाजाता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

DF

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपाचे नेते विजय रूपानी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या उपस्थित विधानभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले.

---Advertisement---

त्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. आमदारांच्या या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्तावा मांडण्यात आला आणि अधिकृत घोषणा करण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी सर्व आमदारांनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री होणार असल्याने राज्यातील विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष केला जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---