गुन्हेजळगाव जिल्हा

Bhusawal : 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरणचा उपकार्यकारी अभियंता जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक दोन तरी लाचखोरीचा प्रकार समोर येत आहे. अशातच आता २० हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता याला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. प्रशांत प्रभाकर इंगळे (वय ४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्या उपकार्यकारी अभियंता याचे नाव असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भुसावळ शहरातील रहिवासी असून ते शासकीय विद्युत ठेकेदार म्हणून ते काम करतात. त्यांनी एका खाजगी कंपनीचा एलएससीच्या स्कीम अंतर्गत नवीन सर्विस कनेक्शन क्षमता वाढ 100 वॅट वरून 200 वॅट करण्याकरता प्रस्ताव भुसावळ येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्याकडे सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उपअभियंता उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान तडजोडी अंती अखेर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदर यांनी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाला या संदर्भात तक्रार केली. पथकाने बुधवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना 20 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button