जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी. रणदिवे शुक्रवारी कार्यमुक्त झाले. त्यांची पुणे जिल्हा परिषदेत बदली झाली असून त्यांच्या बदलीचे आदेश १ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले होते.

जळगाव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी. रणदिवे हे शुक्रवार दि.३० रोजी कार्यमुक्त झाले. श्री. रणदिवे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. तसे आदेश १ सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. जळगाव जिल्हा परिषदेत पंचायत राज समिती दौऱ्यावर येणार होती त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नव्हते. दरम्यान, दि.२९ रोजी पंचायत राज समिती परतल्यानंतर दि.३० रोजी डेप्युटी सीईओ रणदिवे कार्यमुक्त झाले.