जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील श्री संत गजानन भक्त परिवार व हनुमान आखाडा, शाहूनगर यांच्यातर्फे आयोजित जळगाव ते शेगाव सायकल वारीचे शुक्रवार दि.८ रोजी ‘श्री संत गजानन महाराज की जय’ च्या जयघोषात शेगावकडे प्रस्थान झाले.
श्री संत गजानन भक्त परिवार व शाहू नगरातील हनुमान आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षाप्रमाणे यंदाही जळगाव ते शेगाव वारीचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि.८ रोजी शाहू नगरातील हनुमान आखाडा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नाना सोनवणे, संतोष सांळूके, माजी नगरसेवक विजय वाडकर, संतोष शेळके, कैलास तिवारी, भिमराव निंबाळकर, मोहन सोनवणे, दिनेश कोळी, पूनम मराठे, उल्हास नवगाने, मिंलीद पवार, सत्यप्रकाश तिवारी, रवि रानवडे यांसह मान्यवरांच्या हस्ते श्री संत गजानन महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर ‘श्री संत गजानन महाराज की जय’चा जयघोष करत सायकल वारी शेगावकडे रवाना झाली. वारीत समस्त गजानन भक्त परीवाराचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सायकल वारी शेगाव येथे पोहोचल्यानंतर ‘कोरोनापासून सर्वांना मुक्त कर’ असे साकडे श्री संत गजानन महाराजांना घालणार असल्याचे माजी नगरसेवक विजय वाडकर यांनी सांगितले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/226641096164933/