जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । यावल येथे एका उच्चशिक्षित आदीवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. सादीक गनी तडवी (वय२३ वर्ष) असे या तरुणाचे नाव असून या या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत असे की, यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगरमध्ये राहणारा उच्चशिक्षित आदीवासी तरूण सादीक तडवी या तरूणास दिनांक ९ सप्टेंबर हिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपाचारादाखल केले असता निदानात त्यास डेंग्यु झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक ११ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली.
यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील काही दिवसांपासुन काही ग्रामपंचायत आणी आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मोठया प्रमाणावर डेंग्युचे रूग्ण आढळुन आले. यावल नगर परिषदच्या क्षेत्रात देखील गेल्या अनेक महीन्यापासुन जंतुनाशक फवारणी करण्यात आली नसल्याने तसेच स्वच्छता मोहीम देखील मंदावल्याने नगर परिषदच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आदीवासी कुटुंबातील शिक्षक गनी तडवी यांना मरण पावलेला उच्च शिक्षीत तरूण सादीक तडवी दोन बहीणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अशा मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली असुन नगर परिषदच्या कारभारा बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.