⁠ 
रविवार, मे 19, 2024

Demat Account New Rules : शेयर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय ? वाचा डी मॅटचे नवीन नियम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जून २०२२ ।  शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि तुम्ही गुंतवणूकदार असाल तर अश्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सेबीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता (Demat Account New Rules )शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यापासून ट्रेडिंग-डिमॅट खात्यापर्यंत नॉमिनीचे नाव नोंदविणे अनिवार्य आहे. सेबीने 31 मार्च 2022 हि अंतिम मुदतही घोषित केली होती. मात्र, आता सेबीने ती एक वर्षासाठी वाढवली आहे. यामुळे ज्यांच्याकडे डिमॅट किंवा ट्रेडिंग खाते आहे, त्यांच्यासाठी सेबीने 31 मार्चपर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करण्याचा नियम केला आहे. आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात.

‘नॉमिनी करण्यासाठी साक्षीदाराची गरज नाही. नॉमिनीच्या फॉर्मवर खातेदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. याशिवाय, ई-साइन सुविधेचा वापर करून ऑनलाइन भरलेल्या नामांकन/घोषणा फॉर्मसाठी साक्षीदाराची आवश्यकता नाही. मात्र, जर खातेदाराने स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचा ठसा वापरल्यास, फॉर्मवर साक्षीदाराची स्वाक्षरी देखील असणे आवश्यक आहे असे सेबीचे म्हणणे आहे.

जर तुम्हाला तुमच्या खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव देखील जोडायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही नामांकन फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करून मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर कुरियर करू शकता. तुमच्या ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यावर नॉमिनेशन लागू होईल, हा नॉमिनी तुमच्या डिमॅट खात्यात जोडला जाईल. हेच नॉमिनेशन तुमच्या कॉइन होल्डिंगसाठीही लागू होईल. तुम्हाला नॉमिनेशन फॉर्मसोबत नॉमिनीचा आयडी प्रूफ पाठवावा लागेल. यासाठी तुम्ही आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणताही आयडी पुरावा पाठवू शकता. तुमचे खाते उघडल्यानंतर आणि एखाद्याला नॉमिनी बनवल्यानंतर तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल, तर तुम्हाला 25+18 टक्के जीएसटी शुल्क भरावे लागेल. यासाठी, तुम्हाला अकाउंट मॉडिफिकेशन फॉर्मसह नॉमिनेशन फॉर्मची हार्ड कॉपी पाठवावी लागेल.