कोविड योद्धा झाले बेरोजगार! कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । कोविड कालखंडात आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणांचे रक्षण करून, महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवणारे राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आज बेरोजगार असून त्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. दरम्यान, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे महामारी योद्धा संघर्ष समितीने केली.
काय म्हटलं आहे निवेदनात
मागील २८ महिन्यांन पासून राज्यभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचान्यांची आपल्या न्याय हक्कांच्या पुर्तते करीता संघर्षमयी चळवळ चालू आहे. तसेच कोविड कालखंडात आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणांचे रक्षण करून, महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवणारे राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आज बेरोजगार असून त्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न आज निर्माण झाला आहे, कोविड कालखंडात सेवा बजावताना अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे, आणि आज त्यांचेही कुटूंबे उघड्यावर पडली आहेत.
याकरीता महाराष्ट्रात मागील २८ महीन्यांपासून या विषयी शेकडो आंदोलने, हजारोच्या संख्येने निवेदने दिली आहेत, यावर अनेक वेळा विधानसभा सभागृहात अनेक सन्माननीय सदस्यांनी / आमदारांनी तारांकित प्रश्ने / लक्षवेधी घेवून, चर्चा घडवून आणली आहे, हे आपण जाणताच. कोरोना योध्दांच्या बाबतीत आपण सकारात्मक व संवेदनशील आहात याचा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रातील एकुण खालील प्रमाणे कर्मचान्यांनी राज्यातील कोरोना या महाभयंकर साथरोगाशी प्राणपणाने लढा दिला आहे.
हा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट तर होणारच आहे, समायोजनांच्या अनेक उदाहरणांवरून तसेच “शिक्षण सेवक योजनेच्या धर्तीवर नियोजनबद्ध निर्णय झालेस महाराष्ट्राचा परीक्षा, वेतनश्रेणी व ईतर बाबींकरीता मोठ्याप्रमाणावर होणारा खर्च वाचुन, वित्त विभागावर कोणताही अधिकचा भार येणार नाही. तसेच आपण हा वरील नमूद प्रमाणे हजारों युवक- युवतींचा व त्यांचे कुटूंबियांच्या उपजीवीकेचा प्रश्न निकाली काढुन सामाजिक दृष्ट्या मोठे सत्कार्य आपल्या हातून होणार आहे आणि या कार्यसिद्धीस आपण समर्थ आहात.