---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा धमकीचा मेलने खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाला. आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल, असा धमकीचा ईमेल प्राप्त झालाय. त्याच बरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचा धमकीचा ईमेल CMO प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ayush prasad jpg webp

मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठविण्यात आला असून पोलीस या ई-मेलच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

---Advertisement---

मेल करणाऱ्याचा शोध घेणार, पोलीस अधीक्षकांची माहिती
तर जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याबाबत अगोदर ही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेल मधील भाषा पाहता अशा ईमेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. मात्र तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment