जळगावच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या तलावात माशांचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा तलाव म्हणून, मेहरूणचा परिचय आहे. याठिकाणी गेल्या दोन – तीन दिवसांपासून मासे मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत येथील रहिवाशींना विचारणा केली असता तलावात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने माशांच्या मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, कोणीही दखल घेत नसल्याची व्यथाही रहिवाशांनी व्यक्त केली.
सविस्तर असे की, शनिवारी रोजी सेंट टेरेसा शाळेमागील तलावाच्या काठापासून ते श्रीकृष्ण लोनच्या जवळपास एक -दीड किलोमीटरपर्यंत काठालगत मृत मासे दिसून येत आहे. जळगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा तलाव आहे. यावर्षी पावसामुळे तलाव शंभर टक्के भरला आहे. यामुळे याठिकाणी फिरणाऱ्यांची संख्य वाढत आहे.
तलाव परिसरात मोठया प्रमाणात वस्ती वाढत आहे. त्यातच तलावात दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडण्यात येत असल्याने माशांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज येथील रहिवाशींनी व्यक्त केला आहे. याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, कोणीही दखल घेत नसल्याची व्यथा रहिवाशांनी वयात केली.