आधी मुलगा गेला, आता वडिलांचाही अचानक मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२४ । यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे ४९ वर्षीय प्रौढाचा अचानक मृत्यू झाला. विनोद पांडुरंग पाटील असे मृताचे नाव आहे. दरम्यान काही महीन्यापुर्वी विनोद पाटील यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. यानंतर आता वडीलाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना घडली असुन परिसरात शोककळा पसरली आहे.
थोरगव्हाण येथे कुटुंबासह वास्तव्याला असलेले विनोद पाटील हे आज १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दहिगाव शिवारातील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत मिळुन आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
दरम्यान, काही महिन्यापूर्वीच मयत पाटील यांचा मुलगा याने देखील गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली होती. आधी मुलाने आत्महत्या केली नंतर आता वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबासह संपुर्ण गाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची खबर मयताचे प्रमोद पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल अर्जुन सोनवणे करीत आहे.