---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा महाराष्ट्र

प्रिय कब्बु.. सुषमा अंधारेंची मुलीसाठी भावनिक पोस्ट!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. रविवारी लेकीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांनी भावुक पोस्ट लिहिली असून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यात त्यांनी अनेक इशारे आणि सूचक संदेश लेकीला दिला आहे.

images 31 jpeg webp webp

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या गेल्या महिनाभरापासून महाप्रबोधन यात्रा घेऊन निघाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेतील अनेक नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपला त्या आपल्या भाषणात लक्ष करीत आहेत. नुकतेच सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी मुलीसाठी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

---Advertisement---

प्रिय कब्बु, “तू फक्त ४५ दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!”

तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात, बाबासाहेब लिहितात, “जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील.. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा”

सुषमा अंधारे यांच्या फेसबुक पोस्टनंतर त्यांच्या आणि वैजनाथ वाघमारे यांच्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

        

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---