जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील रविवार पेठ(मोठा आखाडा)परिसरात मशिदी लागत इलेक्ट्रिक पोल जवळ गटारीच्यावर १ दिवसांचे नवजात अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत अज्ञात महीलेने गुप्तपणे टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नगिना मशिदी लागत गटारीच्यावर प्लास्टिकच्या पीशवीत स्थानिकांना आढळून आले.यासंदर्भात तातडीने माहिती असता पोलीसांनी घटनास्थळी घेऊन मयत अर्भकला ताब्यात घेऊन त्याची सावदा ग्रामिण रुग्णालयात प्रथम वैद्यकीय तपासणी केली असता सदर अर्भक मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगील्यावर सदर ठिकाणी मरणत्तर पंचनामा करून,यानंतर मयत अर्भकचा रावेर ग्रामिण रुग्णालय येथून पोलीसांनी पोस्टमार्टम करून सावदा येथे आणले. परिणामी सदरील नवजात अर्भक बेवारस असल्याने त्याची योग्य रित्या दफनविधी करण्यात आली.
सदर प्रकरणी शेख रहीम शेख मंजूर सावदा यांनी खबर दिल्याने अज्ञात महीलेच्या विरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.१०१/२०२५ बीएनएस कायदा २०२३ चे कलम ९४ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी आरोपीचा छडा लावण्यासाठी तात्काळ विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले असून,सध्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तापसणी सह वेगवान पध्दतीने पोलीस पथका कडून तपास कार्य सुरू आहे.अशी माहिती सपोनि विशाल पाटील यांनी दिली.
तसेच सदर प्रकरण बद्दल जर कोणाला काही माहिती असल्यास किंवा समजल्यास त्यांनी थेट ही माहिती निःसंकोचपणे पोलीसांना देवून सहकार्य करावे.तरी सदरची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.असे आव्हान सुद्धा त्यांनी केले आहे.