---Advertisement---
वाणिज्य

IRCTC कडून वैष्णोदेवीचे दर्शन ; फक्त 2845 रुपयात मिळेल तिकीटासह राहण्याची, जेवणाची सुविधा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC Tour Package) देशभरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी विविध विशेष टूर पॅकेज आणते. IRCTC टूर पॅकेज खूप स्वस्त आहेत आणि त्यामध्ये उपलब्ध सुविधा खूप चांगल्या असतात. यामुळेच IRCTC टूर पॅकेज पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. IRCTC टूर पॅकेजमध्ये निवास, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था करते.

vaishno devi irctc tour package

दरम्यान, अशात जर तुम्ही माता वैष्णो देवीच्या दर्शनाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे IRCTC ने आता माता वैष्णो देवी टूर पॅकेज लाँच केले आहे. या दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीपासून होणार आहे. अवघ्या 2845 रुपयांच्या टूर पॅकेजमध्ये तुम्ही माँ वैष्णो देवीचे दर्शन घेऊ शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेनची तिकिटे आणि हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण सुविधा मिळेल.

---Advertisement---

या सुविधा उपलब्ध असतील
Moneycontrol.com च्या वृत्तानुसार, IRCTC माता वैष्णोदेवीच्या टूर पॅकेजमध्ये, उत्तर संपर्क क्रांती ट्रेनचे नॉन-एसी स्लीपर क्लासचे तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या कटरा गेस्ट हाऊसमध्ये दोन दिवस आणि एक रात्र एसी रूममध्ये राहण्याची सोय केली जाईल. गेस्ट हाऊसमध्ये प्रवाशांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय कटरा येथे फिरण्यासाठी प्रवाशांना एक वाहनही दिले जाणार आहे.

या दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीतून होणार
या दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीपासून होणार आहे. पहिल्या दिवशी रात्री साडेआठ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून प्रयाण. रात्रभर प्रवास केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी कटरा येथे पोहोचाल. तेथून प्रवासी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी 6 वाजता कटराहून परतण्यासाठी ट्रेनचे तिकीट बुक केले जाईल. रात्रभर प्रवास करून प्रवासी दिल्लीला येतील.

असे बुकिंग करा
IRCTC टूर पॅकेज 2845 रुपयांना उपलब्ध असेल. तुम्ही ते घरबसल्या बुक करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ला भेट द्यावी लागेल. एका खोलीत राहण्यासाठी प्रवाशाला प्रति व्यक्ती ५३३० रुपये मोजावे लागतील. डबल शेअरिंग रूमसाठी 3240 रुपये खर्च येणार आहेत. ट्रिपल शेअरिंगसाठी 2845 रुपये द्यावे लागतील. जर प्रवाशाला 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुले असतील तर त्याला प्रति बेड 1835 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---