⁠ 
रविवार, मे 5, 2024

तुमच्याकडेही Airtel सिम आहे का? रिचार्ज करण्यापूर्वी ही बातमी वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । जर तुमच्याकडेही एअरटेलचं सिम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दूरसंचार कंपनी एअरटेलच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले असून त्याचा परिणाम ग्राहकांवरही होताना दिसत आहे. खरंतर आता एअरटेलने एक महत्त्वाची कामगिरी केली आहे आणि हे यश एअरटेलने 1 वर्षातच मिळवले आहे.

नेमकं काय आहे?
ही महत्त्वाची गोष्ट एअरटेलच्या ग्राहकांना खूप चांगली बातमी देऊ शकते. भारती एअरटेलने सांगितले की ते त्यांच्या 5G नेटवर्कवर पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे. 5 कोटी ग्राहकांची भर पडल्याने कंपनीच्या ताळेबंदावरही परिणाम होणार आहे. एअरटेल 5जी प्लस सेवा सुरू केल्याच्या एका वर्षातच ही कामगिरी केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

5G सेवा
सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील दूरसंचार कंपनीने सांगितले की, एअरटेल 5G प्लस सेवा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. देशातील विविध शहरांमध्ये एअरटेलकडून 5G सेवा पुरवल्या जात आहेत आणि लोकही या सेवांचा वापर करत आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “एअरटेलने पाच कोटी ग्राहक जोडून 5G मध्ये आपली वाढ सुरू ठेवली आहे.”

airtel 5g सेवा
सर्वात जलद वेळेत हे यश संपादन करून, Airtel 5G Plus सेवा आता सर्व राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) रणदीप सेखॉन म्हणाले की, लाखो ग्राहकांनी 5G स्वीकारण्याच्या गतीने कंपनी रोमांचित आहे. ‘आम्ही हा टप्पा लक्ष्याच्या पुढे गाठत आहोत.’