---Advertisement---
जळगाव शहर

आर्यन रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमाला गर्दी, मनपाकडून ५० हजारांचा दंड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या आर्यन इको रिसॉर्टमध्ये शनिवारी एका कंपनीच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याने बाहेर गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांना याबाबत माहिती पडताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक आणि मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. मनपा पथकाने आयोजकांना ५० हजारांचा दंड केला आहे.

aryan mi fine

जळगावपासून जवळच असलेल्या सावखेडा शिवारातील आर्यन इको रिसॉर्ट येथे शनिवारी दुपारी एका कंपनीचा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी ५० लोकांची परवानगी असताना अचानक मोठी गर्दी उसळली. रस्त्यावर आणि बाहेर वाहनांची व नागरिकांची गर्दी दिसून येत असल्याने याबाबत पोलिसांनी माहिती मिळाली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार लागलीच पथकासह त्याठिकाणी पोहचले.

---Advertisement---

मनपा उपायुक्त शाम गोसावी यांच्या पथकातील अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे व इतर आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपनिरीक्षक कल्याण कासार, उपनिरीक्षक सायकर, हवालदार वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड, अनिल तायडे, मनोज पाटील, अशोक पाटील यांच्यासह केलेल्या पाहणीत कार्यक्रमाला २०० पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्याचे आढळून आले. तसेच कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाने आयोजकांना ५० हजार रुपये दंड आकाराला आहे. पोलीस आणि मनपाने आयोजकांना दंड केला असल्याने अनेकांचे धाबे दणाणणार असून कार्यक्रम आयोजित करताना ते खबरदारी घेतील हे मात्र नक्कीच. दरम्यान, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात आयोजकांसोबत लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल चालकांना देखील दंड केला जात असल्याने मोठी ओरड झाली होती. कोरोनाची तिसरी लाट सौम्य असल्याने केवळ आयोजकांना दंड केला जात असल्याने काहीसा दिलासा आहे.

पहा कारवाईचा व्हिडीओ :

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---