⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सराईत गुन्हेगार चिच्या अटकेत

सराईत गुन्हेगार चिच्या अटकेत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दाेन दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । दुचाकी चोरी सह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चिच्या यास एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.

रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी परिसर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा गावातून दिलीप शिवदास गोपाळ यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ६४५) १९ मार्च रोजी चोरीस गेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोपाळ यांची दुचाकी रितेश शिंदे याने चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाली.

त्यानुसार, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रवींद्र चौधरी, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनीत सापळा रचून रितेशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. रितेश विरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.