जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात एक अल्पवयीन मुलगी घराबाहेर झाडू मारत असताना एक मद्यपी तरुणाने तिची छेड काढून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात १५ वर्षीय विद्यार्थिनी कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास विद्यार्थिनी घराबाहेर झाडू मारत असताना तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख हा दारूच्या नशेत आला. विद्यार्थिनीला डोळा मारत तिला जवळ ओढून लज्जास्पद कृत्य केले.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख रा.तारगल्ली, तांबापुरा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.