फैजपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेता शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली जात होती. याविषयी आज पत्रकारांशी संवाद साधताना आमदार शिरीष दादा चौधरी यांनी तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन एस चव्हाण व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी सुचना केल्या.
तसेच यासंदर्भात फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकारी किशोर चव्हाण, प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्यासोबत देखील सविस्तर चर्चा केली.येत्या दोन दिवसांत फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नारीशक्तीच्या दिपाली चौधरी यांनी केली होती लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी २३ एप्रिल रोजी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी निवेदनाद्वारे आ.शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, पालकमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, खासदार रक्षाताई खडसे, तसेच माजी मंत्री गिरीश महाजन,आ.राजुमामा भोळे यांच्याकडे देखील फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती इमेलद्वारे निवेदन देऊन करण्यात आली होती.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आता लवकरच फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.