जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । लोहारा कुऱ्हाड जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रेखाला दीपकसिंग राजपूत यांनी आज वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यावेळी त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग शांतीलाल राजपूत हे देखील उपस्थित होते.

यावेळी वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.शेखर पाटील व डॉ.मयुर पाटील,यांच्याशी सखोल चर्चा केली.
तसेच उद्भवणा-या अडीअडचणी, बाह्यरूग्णांची सरासरी, कर्मचारी व इतर बाबतीत देखील परिस्थिती जाणून घेतली. डाॅ.शेखर पाटील यांनी कोरोना लसीकरण व बाह्यरुग्ण सेवेबाबत माहिती दिली. यावेळी रेखाताई राजपूत यांनी जनतेला आव्हान करताना सांगितले की नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. असे सांगितले.