⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 18 हजार नागरीकांचे लसीकरण

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 18 हजार नागरीकांचे लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (14 एप्रिलपर्यंत) 1 लाख 95 हजार 214 नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर 22 हजार 854 नागरीकांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती केंद्र शासनाच्या कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालये असू एकूण 133 लसीकरण केंद्रांवर नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच 40 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहे. नागरीकांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्रही वाढविण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 214 नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर 22 हजार 854 नागरीकांना दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 840 हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला व 11 हजार 336 व्यक्तींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. तर 18 हजार 771 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला व 5 हजार 850 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर 45 वर्षावरील 1 लाख 52 हजार 603 नागरीकांनी पहिला व 5 हजार 668 नागरीकांनी दुसरा डोस घेतला असल्याची आकडेवारी कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.