⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज |२७ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या ३० व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन दि.२४ मे रोजी करण्यात आले आहे.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व युजीसीचे व्हाइस चेअरमन भूषण पटवर्धन यांची उपस्थिती राहणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाईन पध्दतीत दीक्षांत समारंभ झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच ऑफलाईन पध्दतीत हा सोहळा पार पडणार आहे. या दीक्षांत समारंभात स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. पीएच.डी पदवी देखील देण्यात येणार आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली असून यात १२४ अभ्यासक्रमांच्या ३७३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यातून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात येणार आहे.