---Advertisement---
गुन्हे जामनेर

भरधाव कंटेनरची पैठण-भुसावळ बसला जोरदार धडक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । जामनेर तालुक्यातील पहूर येथे कंटेनरने एसटीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यात बस चालकाला दुखापत झाली असून त्यांच्यावर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

pahur bus accidet

नेमकी घटना काय?
पैठण आगाराची पैठण भुसावळ बस (क्र. एमएच २० बीएल ३९०१) शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास पहूरकडून जामनेरकडे जात होती. तेव्हा रेल्वे क्रॉसिंग जवळ जामनेरकडून पहूरकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने ( क्र. एचआर ३८ एबी ९२३५) एसटीला जोरदार धडक दिली. यात बसचे चालक ए. व्ही. बढे यांच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने बसमधील प्रवास्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. बसचालक बढे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---