⁠ 
शनिवार, जून 15, 2024

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या निराकरणासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. एक रूपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३- २४ योजना जिल्ह्यात ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी (पुणे) या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. पीक विमाधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नियुक्ती व सर्व सुविधायुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावरील प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक असे आहेत. जळगाव जिल्हा- समाधान लक्ष्मण पाटील – ९९२१५७५९४०, जळगाव तालुका- विजय संतोष अस्वार – ९८३४८८८२१०, भुसावळ – अविनाश ताराचंद बारी- ७४९९३९३४६०, बोदवड – पंकज लक्ष्मण सपकाळे- ९९२३३५७०६१, यावल- विकास विश्वनाथ शिंदे – ७७०९७३७६०७, रावेर- राजेंद्र पाटील- ८२०८३५७२२१, मुक्ताईनगर- भूषण संतोष सपकाळे- ८६२४१५२४०३, अमळनेर- किरण रघुनाथ पाटील- ८९७५१८७४२३, चोपडा- जितेंद्र सुभाष वानखेडे – ७६५०२५५०७१, एरंडोल – राहूल उगमसिंग पाटील- ८८३००३७४२९, धरणगांव- योगेश्वर जगन पाटोल- ७७७३९१३४५३, पारोळा- ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी- ९८३४४३६१८७, चाळीसगांव- राहुल रविंद्र पाटील- ८८३००३७४२९, जामनेर – योगीराज अशोक महाजन- ८८३०५७४१९९, पाचोरा-समाधान बारकु मोरे- ९६२३४२०६७०, भडगांव- पंकज मधुकर चौधरी- ८४५९१८५९८२ असे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१३ पर्यंत होती. मात्र शासनाने ३ दिवसाची मुदतवाढ दिली असल्याने ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात अर्ज करून विमा योजनेत व्हावे. असे आवाहनही श्री.ठाकूर यांनी केले आहे.