---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

महाविकास आघाडीवर आणखी एक संकट! काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता देणार राजीनामा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । राज्यातील राजकारणात आज पहाटे एक राजकीय बॉम्ब फुटला आहे. तो म्हणजे विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे तब्बल १३ आमदारांना घेऊन नॉट रिचेबल आहे.ते गुजरातमध्ये एका मोठा हॉटेलमध्ये असल्याचे समजते. यामुळे महाविकास आघाडी कोसळणार का? आता असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता अशात एक मोठी समोर आलीय

mahavikas aghadi 1

दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

---Advertisement---

काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. या पराभवाची जबाबदारी मी घेतो, असं थोरात काल म्हणाले होते. आता थोरात काँग्रेसच्या गटनेतेपदावरून पायउतार होण्याच्या मनस्थितीत असल्याचं समजतं.

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भाजपनं मविआला दोन मोठे दणके दिले आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---