⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | बातम्या | काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आपल्या संपर्कात ; गिरीश महाजनांच्या दाव्याने खळबळ

काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आपल्या संपर्कात ; गिरीश महाजनांच्या दाव्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला होता. शिंदे यांना शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे अडीच वर्षे सत्तेत असलेली महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं असून त्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार अनुपस्थित होते. यात अशोक चव्हाणांसह काही मोठ्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशात आता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने आलं होतं. माझ्या संपर्कातील लोकांना असं वाटतं की तिकडे राहून काही उपायोग नाही.

पुढे ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सेनेची नैसर्गिक युती नव्हती. सेना-भाजप एकत्र लढलो होतो. जनतेनं आम्हाला निवडून दिलं होतं. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व विकासाच्या दृष्टीने नंबर एकवर आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की भाजपशिवाय आता पर्याय नाही.

माझ्या संपर्कात काँग्रेस , राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आहेत. काँग्रेसमध्ये तर मोठं अलबेल सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वही कोणाला विचारत नाही? खाली काय सुरू आहे याकडे त्यांचं लक्ष नसतं. काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे कोणाला विचारतात? कोणाला वेळ देतात? त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्व अलबेल सुरू आहे. अनेकांना वाटतं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, जिथे आपल्याला राजकीय न्याय मिळेल , असा दावा महाजनांनी केला आहे. यानंतर आता शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.