जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । काँग्रेस भवनात (ता. ८) जिल्हा कॉंग्रेसची बैठक झाली. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी १८० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. त्यात २९ उपाध्यक्ष, ५१ चिटणीस, ४२ सरचिटणीस, २१ विशेष निमंत्रित सदस्य, एक खजिनदार, तर २८ सदस्यांचा समावेश आहे.

आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महिलाध्यक्षा सुलोचना वाघ, सेवादल अध्यक्ष संजीव पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष सलीम पटेल, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी. जमील शेख, युवक काँग्रेसचे मध्यप्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी, प्रभाकर सोनवणे, खजिनदार सुरेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.