जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे व इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनोवेशन्स इन इंजिनिअरिंग अँड सायन्स आयजेआयईएस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयईईई बॉम्बे सेक्शन यांच्या टेक्निकल प्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर परिषदेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सत्यनारायण भिसेट्टे (प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व निवृत्त शास्त्रज्ञ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च), प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. प्रवीण फालक (उपप्राचार्य), डॉ. हेमंत इंगळे (समन्वयक), डॉ. विजय डी चौधरी (उपसमन्वयक) तसेच सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग आणि सहभागी संशोधक उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल माहिती देत सद्यस्थितीतील सर्व प्रकारच्या शाखांच्या प्रणालीचा विकास यावर भाष्य केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वेगवेगळ्या विभागातून पेपर्स आले आहेत व प्रत्येक वर्षी रिसर्च चे आकडे हे निरंतर वाढत आहे हे कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने संशोधनाची वाढती वाटचाल राहील ही अपेक्षा व्यक्त केली. तसेच विकसित भारताचे स्वप्न यामध्ये प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे. त्यांनी परिषदेमध्ये आलेल्या सर्व संशोधकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. सत्यनारायण भिसेट्टे यांनी ए आय, काँटम अँड न्यूरोमोर्फिक कॉम्प्युटिंग अँड अदर कटिंग एज टेक्नॉलॉजी हा होता.
ग्लोबल लेव्हलवर महत्त्वाचा विषय असल्याने कीनोट साठी तो निवडला असे त्यांनी आवर्जून सांगितले.टेक्नॉलॉजी प्रेडिक्शन बद्दल सांगताना त्यांनी विविध मुद्दे विश्लेषण करून सांगितले. तंत्रज्ञानाने कोरोना काळात फुफ्फुसाचा थ्री डायमेन्शनल अभ्यास शक्य होऊ शकला. त्यानंतर आपले संशोधन ऑनलाइन पद्धतीने सादर केले.संशोधन सादर करतेवेळी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची नियुक्ती करण्यात आलेली होती. कॉम्प्युटरसाठी डॉ. इंद्रभान बोरसे (एसएसव्हीपीएस, धुळे) इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमिनिकेशन व बेसिक सायन्सेस अँड ह्युमेनिटीज साठी डॉ. एस पी मोहनी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जळगाव), मेकॅनिकल साठी डॉ. जे ए होले (जे एस पी एम राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे) व इलेक्ट्रिकल साठी डॉ. अनुराग रॉय (सीईओ, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) यांचे अनमोल सहकार्य लाभले.सदर परिषदेसाठी कॉम्प्युटर विभागात ५० संशोधन पेपर प्राप्त झाले असून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात २५, मेकॅनिकल विभागात १०, इलेक्ट्रिकल विभागात ८ व बेसिक सायन्सेस विभागात ३ संशोधन पेपर सादर केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे अधिष्ठाता व आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ.हेमंत इंगळे व उपसमन्वयक डॉ. विजय डी. चौधरी यांनी परिषदेचे नियोजन केले होते. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधकांचे मार्गदर्शन लाभले. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेचे बेस्ट पेपर विजेते ट्रॅक
ट्रॅक संगणक शाखा — फ्रॉम इंटरव्यूज टू इनसाईटस: ए रिव्ह्यू ऑफ मल्टी मॉडल पर्सनॅलिटी असेसमेंट इन रिक्रुटमेंट आर राजपूत, ए जे खराडे,ए पी पवार, टी एस वखारे, प्रो. डी डी अहिर एम इ एस वाडिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे,ट्रॅक इअॅन्डटीसी शाखा परफॉर्मन्स अँड कॉम्पिटिशनली पीसीएमसी ऑफ डीप लर्निंग मॉडेल्स इन अनोमली डिटेक्शन इन युडीडीएस डाटा सेट संगीता राजपूत डॉक्टर मंगेश निकोसे स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी संदीप युनिव्हर्सिटी नाशिक,ट्रॅक मॅकॅनिकल शाखा स्मार्ट फ्लॅश सिस्टीम- चेतन आर पाटील आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर ट्रॅक इलेक्ट्रीकल शाखा ऍड्रेसिंग द चॅलेंजेस इन फीडिंग रेल्वे प्लॅटफॉर्म रूफ टॉप पीव्ही जनरेशन टू २५ केव्ही एसी ओव्हरहेड ट्रॅक्शन- नागेश एस पांडे डॉ.अतुल आर फडके डॉ. प्रशांत गायधने गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जळगाव