⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

२४ वर्षीय तरूणाच्या गुदद्वाराची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शल्यचिकीत्सकांच्या प्रयत्नाला यश

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । भुसावळ तालुक्यातील ३४ वर्षीय तरूणाच्या गुदद्वाराच्या मार्गाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी कौशल्य पणाला लावून यशस्वी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय कोळी ह्या तरूणाच्या गुदद्वाराची जागा बाहेर आली होती. त्याला अत्यंत त्रास होत होता. त्याने स्थानिक ठिकाणी वैद्यकीय तज्ञांकडे दाखविले असता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसानंतर त्याच्या पोटातील आतडे फुटून पोटात विष्ठा पसरली होती. अशा परिस्थितीत तो डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आला. याठिकाणी विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी त्याची तपासणी केली.

एक्स-रे करण्यात आल्यानंतर निदान करण्यात आले. यावेळी त्याच्यावर शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी एस्क्युलेटरी लॅप्रोटोमीची शस्त्रक्रिया केली. यात संडासची जागेचा मार्ग बंद करून पोटाच्या उजव्या बाजूने मार्ग काढण्यात आला. तसेच सदर रूग्णाला काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला. मात्र रूग्णाने शस्त्रक्रियेनंतर काळजी न घेतल्याने इन्फेक्शन झाले. त्याच्या पोटातील आतडे पुन्हा बाहेर आले. अशा परिस्थीतीत त्याने मुंबई गाठली. त्याठिकाणी पायाची चामडी काढून पोटाजवळ लावण्यात आला.

तीन महिन्यानंतरही त्याला त्रास कायम राहिल्याने रूग्ण पुन्हा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आला. यावेळी डॉ. भूषण चोपडे यांनी त्याची कोलनोस्कोपी करून गुदद्वाराची जागा मोठी केली. त्यानंतर शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी पोटाजवळील संडासचा मार्ग बंद करण्याची शस्त्रक्रिया केली. अखरे सहा ते आठ महिन्यांनंतर रूग्णाच्या संडासची जागा पुर्ववत झाली. या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांना डॉ. स्मृती भोजने, डॉ. अमेय लोखंडे, भूलशास्त्र तज्ञ डॉ. शितल ढाके यांनी सहकार्य केले.