---Advertisement---
रावेर

आदलवाडी येथील ग्रा.पं.च्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

aadalwadi
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । खिर्डी पासून काही अंतरावर असलेले आदलवाडी ता.रावेर येथील ग्रा.प.चे ग्रामसेवक व सरपंच पती यांची शासकीय कामात होत असलेली ढवळाढवळ तसेच ग्रा.प.सदस्य यांना विश्वासात न घेता व घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बौद्ध समाज बांधवांची गटविकास अधिकारी सौ.रावेर यांच्याकडे चौकशी ची मागणी.

aadalwadi

सविस्तर वृत्त असे की, आदलवाडी येथे महावितरणकडून विद्युत पुरवठा हा खंडीत न होता तो सुरळीतपणे चालू राहण्याकरिता दलित वस्थीत नवीन डीपी ही मंजूर असून ती बसवण्यासाठी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक/सरपंच पती ने परस्पर जागा ठरवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ निश्चित करण्यात आली.तसेच त्याठिकाणी आधीपासून गावात पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेले व  चालू स्थितीत असलेले इंजिन घर ही तोडण्यात आले. व ते इंजिनघर पाडण्यासंदर्भात ग्रामपंचायत कडून कुठलाही ठराव न करता हुकूमशाही पद्धतीने तोडण्यात आले.त्याचबरोबर दलीतवस्ती मधून निवडून आलेले सदस्य तथा रहिवासी यांना सुद्धा विश्वासात न घेता परस्पर मनमानी कारभार करत निर्णय घेऊन ग्रामसेवक व सरपंच पती यांनी आंबेडकर प्रवेशद्वारा जवळ डीपी बसविण्यासाठी जागा निश्चित केली.

---Advertisement---

हे जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने चुकीचे निर्णय घेत आहेत व त्याठिकाणी डीपी बसविल्यानंतर त्यातील पडणारे ऑइल वगैरे हे एखाद्यावेळेस प्रवेशद्वारावर उडून फोटो तसेच शॉर्टसर्किट किंवा स्फोट झाल्यास हानी होऊन विटंबना होऊन सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो.असे सुज्ञ नागरिक तथा रहिवासी यांच्याकडून त्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या डीपी ची जागा बदलावी व होणारा अनर्थ टाळावा.अशी सूचना मांडण्यात आली.तसेच याआधी सुद्धा गावात अशा काही कारणामुळे दोन समाजात वाद निर्माण झाल्याने दंगल झालेली आहे.तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामसेवक व सरपंच पती यांच्या शासकीय कामामध्ये ढवळाढवळ तसेच जनहीताचे निर्णय न घेता मनमानी पद्धतीने हेतुपुरस्सकर चुकीचे निर्णय घेऊन सामाजिक तेढ निर्माण होईल असे निर्णय घेतात.त्यामुळे संबंधित ग्रा.प.तसेच ग्रामसेवक/सरपंच पती यांनी या संदर्भात घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर सुपडू तायडे,तायडे,कडू वाघो,तायडे सुभाष पाव्हऊ,आकाश तायडे दिलीप तायडे यांसहइतर बौद्ध  समाजबांधव यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---