⁠ 
सोमवार, मे 20, 2024

दिलासादायक ! खाद्यतेलाच्या दरात 9 टक्क्यांची घसरण; पुढील काळात तेल आणखी स्वस्त होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । महागाईने होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे इंडाेनेशियाने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय मागील महिन्यात जाहीर केल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील सर्वच खाद्यतेलाचे दर कमी हाेण्याला सुरूवात झाली आहे. किरकाेळ बाजारात खाद्यतेलाची दर ९ रुपयांनी कमी झाले आहेत.

भारतात एकूण वापराच्या ६८ टक्के खाद्यतेल आयात केले जाते. यात युक्रेन, रशिया, मलेशिया, इंडाेनेशिया, अर्जेंटिना देशाचा मोठा वाटा आहे. मात्र, रशिया- युक्रेन युद्धामुळे भारताची सूर्यफूल तेलाची तर इंडाेनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाची आयात बंद झाली. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले होते. अगाेदरच महागाईने होरपळत असलेल्या सामान्यांना, खाद्यतेलाच्या महागलेल्या दरांनी बेजार केले होते.

केंद्र सरकारने यात दिलासा देण्यासाठी आयातशुल्क पूर्णपणे माफ करण्याची तसेच सेसही हटविण्याची घाेषणा केली हाेती. याचा परिणाम म्हणजे इंडाेनेशियातून भारतात तेलाची खेप पाेहाेचण्यापूर्वीच सर्वच तेलाचे दर कमी हाेत आहेत. सध्या बाजारातील खाद्यतेलाची मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे दर अजून घसरू शकतील.

स्थानिक बाजारात खाद्यतेलाचे दर ( प्रती लिटर / रूपये)
सूर्यफूल तेल १८० रु. २२० रु.
सोयाबीन तेल १५० रु. १७० रु.
पाम तेल १४० रु. १५० रु.