आ. चिमणराव पाटील व आ. लता सोनावणे यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिंदेवासी झालेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्ध निदर्शने कारणात येत आहेत. कित्येक ठिकाणी याला हिंसक वळण देखील आले आहे. शिवसैनिकांचा संतापाचा उदक होत असून आमदारांची कार्यालये फाडण्यात येत आहेत. अश्या वेळी जिल्ह्णातील आ. चिमणराव पाटील व आ. लता सोनावणे यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्त बसवण्यात आला आहे.
राज्यभरात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. तसेच आमदारांच्या छायाचित्रांना नावांना तसेच कार्यालयावर हल्लाबोल केला जात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर राज्य पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. तर जळगाव शहरातील आमदार लता सोनावणे यांच्या बंगल्यावर देखील खडा पहारा लावण्यात आला आहे.