जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२५ । राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसत असून जळगावसह अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. यामुळे थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीगनरह विदर्भात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरात मंगळवारी किमान तापमान ९.६ अंश नोंदवले गेले. मात्र, त्याच वेळी कमाल तापमान २९.४ अंशांवर पोहोचले. सकाळी आणि सायंकाळी थंडीचा कडाका जाणवत असून मात्र दुपारच्या वेळी थंडी गायब होऊन उष्णता जाणवत होती.रात्रीच्या वेळी ढग नसल्यामुळे जमिनीची उष्णता वेगाने अवकाशात निघून जात असल्याने रात्री आणि पहाटे कडाक्याची थंडी जाणवते आहे

दरम्यान पुढील तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान तापमान ७ ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. कमाल तापमान २९ ते ३१ अंश असेल.






