जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. यातच रेल्वेने भुसावळ, जळगाव मार्गे कोइम्बतूर-भगत की कोठी आणि वापी-दानापूर विशेष एक्स्प्रेस सुरु केली आहे. यामुळे जळगावकडून उत्तर, दक्षिण भारतात जाणाऱ्यांची सोय झाली.

०६१८१ कोइम्बतूर-भगत की कोठी साप्ताहिक
विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे १० एप्रिल ते ३ जुलैपर्यंत दर गुरुवारी पहाटे २.३० वाजता कोइम्बतूर येथून सुटेल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ३.३५ वाजता जळगावला पोहोचेल. शनिवारी भगत की कोठी येथे पोहोचेल. ०६१८२ भगत की कोठी-कोइम्बतूर रेल्वे १३ एप्रिल ते ६ जुलैपर्यंत दर रविवारी रात्री ११ वाजता भगत की कोठी येथून सुटेल. सोमवारी सायंकाळी ६.३६ वाजता जळगावला पोहोचेल. त्याचबरोबर ०९०६३ विशेष १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री १० वाजता वापी येथून सुटेल आणि रविवारी पहाटे ४.४० वाजता जळगावला पोहोचणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
या स्थानकांवर असेल थांबा?
ही गाडी तिरुपूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टई, काटपाडी, रेनिगुंटा, कडप्पा, येरागुंटला, गूटी, ढोणे, कुरनूल सिटी, महबूबनगर, काचेगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा जंक्शन, हिंगोली, वाशिम, सुरगाव, नांदेड, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधणा, वडोदरा, अहमदाबादसह जवळपास ३६ स्थानकांवर या गाडीला थांबा असेल.