⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगाव फळविक्री सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे वर्चस्व

भडगाव फळविक्री सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे वर्चस्व

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । भडगाव सहकारी फळविक्री सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. प्रतिस्पर्धी पॅनलचे तीनही उमेदवार पराभूत झाले असून यात जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब बबनराव देशमुख, शेतकरी सहकारी संघाचे संचालक विश्वासराव खुशाल पाटील, सुधीर पुंडलिक पाटील यांचा समावेश आहे.

भडगाव सहकारी फळविक्री सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक १३ जागांसाठी घेण्यात आली. सुरुवातीला सहकार पॅनलच्या ४ जागा बिनविरोध निवडुन आल्या होत्या. ९ जागांसाठी एकुण १३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. सहकार पॅनलचे ९ उमेदवार तर प्रतिस्पर्धी पॅनलचे ३ उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे भगवान सोनजी पाटील (२०३ मते), दिलीप नारायण पाटील (२१०), राजेंद्र वामन पाटील (१८३), शामराव गोबजी पाटील (२०३), शिवाजी राजाराम पाटील (२३९), सुभाष धनराज पाटील (१९६), सुनील भगवान पाटील (२०२), रवींद्र जयवंतराव पवार (१९६), विठ्ठल ज्योतीराम पाटील (१७०) विजयी झाले. तर खुमानसिंग हिलाल पाटील, काशिनाथ रतन वाघ, आशाबाई यशवंत पाटील, नीताबाई दीपक पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. नानासाहेब बबनराव देशमुख (१३९ मते), विश्वासराव खुशाल पाटील (१४४) यांच्यासह दाेन जागांवर सुधीर पुंडलिक पाटील (२६) व (१२२) यांचा पराभव झाला.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.