पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; नदी-नाल्यांना पूर

सप्टेंबर 16, 2025 6:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने दगडी नदीला पुन्हा पूर आल्याने सातगाव डोंगरीकडून मराठवाड्यात येणाऱ्या रस्त्याचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेले असून नागरिकांनी देखील भीतीपोटी रात्र जागून काढली आहे.

New Project 6

पाचोऱ्यातील सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी या परिसरातील वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परिणामी या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच भागातील दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे.

Advertisements

पुराच्या पाणी शिरल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तसेच सातगाव डोंगरीकडून मराठवाड्यात येणाऱ्या रस्त्याचा संपर्कही तुटला आहे. पुराचा वेढा पडल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका वाणेगाव शिंदाड व निंभोरी या गावांना बसण्याची माहिती आहे.

Advertisements

शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून

अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरात काही वेळातच पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्यात परिसरातील काही जनावर पशुधन वाहून गेले आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. दरम्यान गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now